Breaking
आरोग्य व शिक्षण

समनापूर – मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी रमली मुले. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण*

0 0 2 7 7 8

समनापूर – मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी रमली मुले.
मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण* दि.१७. (प्रतिनिधी)संगमनेर तालुक्यातील
समनापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तसेच परिसरातील शाळांत इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या नवगतांचे औक्षण करून, तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी नितीनभाऊ शेरमाळे, व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खेमनर, सरपंच कमलताई बर्डे, पोलीस पाटील गणेश शेरमाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ शेरमाळे , जगनशेठ चांडे, शिक्षणतज्ञ मच्छिंद्र शेरमाळे, उपसरपंच सविता भवर, ग्रामविकास अधिकारी सुनिल नागरे , तलाठी संतोष लंके, उर्दु शाळा अध्यक्ष साजिद शेख, संजय चांडे, राजू शेख , राजेंद्र चांडे, मनोज चांडे , इनरव्हील क्लबचे नानासाहेब शेरमाळे, भागवत शेरमाळे, मोक्ष योगा विद्यालयाचे देवा शेरमाळे , रणजित जाधव इ.मान्यवर विराजमान होते.

गुणत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न :- मुख्याद्यापक राजूबाई कर्पे.

मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी प्रयत्न केले पाहिजे, तसेच प्राथमिक शाळेत दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्याद्यापक राजूबाई कर्पे यांनी केले. शाळेत दर महिन्याला नवनवीन उपक्रम, तसेच स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, स्पेलिंग आदीबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे व्यवस्थापन अध्यक्ष संतोष खेमनर म्हणाले. यावेळी मुलांना लापशी व पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आदीनाथ जाधव, गोरक्षनाथ नेहे , जयश्री साळवे, सरला चांडे, सचिन शेरमाळे , रावसाहेब शेरमाळे, प्रभाकर गेठे, शशीकांत रोकडे, नितीन पावले, दादा जोर्वेकर, बारकू गायकवाड, ताई शेरमाळे, आदी पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खैरनार यांनी केले, तर भाऊसाहेब वाकचौरे यांनी आभार व्यक्त केले . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वैभव जोशी, नामदेव वाडेकर, पंकज कवडे , सुनिता जोंधळे, सविता देशमुख, योगिता गोफने, मनिषा शिंदे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गावातून फेरी काढण्यात आली. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आली. शाळेच्या आवारात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे