Breaking
ब्रेकिंग

दिल्ली नाका, संगमनेर येथे कल्याण मटका जुगार अड्ड्यावर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा – छाप्यात मुद्देमालासह एक आरोपी ताब्यात*

0 0 2 7 7 8

अहमदनगर:-दि.२४ जून.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडून पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवत आहे आत्ता गेल्यास मिळुन येतील अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पोहेकॉ सचिन अडबल,पोहेकॉ रवींद्र कर्डिले,पोहेकॉ/ मनोज गोसावी,पोहेको ज्ञानेश्वर शिंदे,पोना/ विशाल गवांदे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,पोकॉ/ अमृत आढाव यांचे पथक खासगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडुन पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवताना दिसला
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठिक 13/10 या सुमारास छापा टाकुन चिठ्या देणा-या इसमास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव 1) बशीर इसाक शेख, वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर असे असल्याचे सांगितले. त्यास सदर मटाका मालकाबाबत विचारपुस करता तो स्वतः मालक असल्याचे सांगुन तो स्वतःचे अर्थीक फायद्या करीता मटका घेत असल्याचे सांगितल्याने, सदर इसमाची अंगझडती घेतली असता रोख रक्कम व मटका खेळण्यासाठी लागणारे साधने मिळुन ती खालील प्रमाणे

1) 12,600/-रू रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोट अंगझडतीत मिळुन आलेली

2). 00-00/- रु किं. चे मटका खेळण्यासाठी लागणारे जुगारचे साहित्य त्यात बोल पेन, कोर्बन पेपर व

आकडे लिहलेली नोट बुक असे असलेले

12,600/- रु एकुण

येणेप्रमाणे वरील वर्णनाची व किंमती चे रोख रक्कम व कल्याण नावाचे मुटका खेळण्याचे जुगाराचे साधने इसम नामे बशीर इसाक शेख याचे ताब्यात मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी
दिनांक 23/06/2022 रोजी 13/10 वा चे सुमारास दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये इसम नामे बशीर इसाक शेख, वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर हा कल्याण मटका खेळतांना व खेळवितांना वरील मुद्देमालसह मिळुन आला आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल 1487/सचिन दत्तात्रय अडबल यांनी त्यांचे विरुध्द महा. जु.का. कलम 12 (अ) प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे