Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

खुनाचा प्रयत्न करणा-या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस एमआयडीसी पोलसांनी सातारा जिल्हयातुन केले जेरबंद. एमआयडीसी पोलीसांची कामगिरी.

0 0 2 7 7 8

खुनाचा प्रयत्न करणा-या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीस एमआयडीसी पोलसांनी सातारा जिल्हयातुन केले जेरबंद. एमआयडीसी पोलीसांची कामगिरी.

अ.नगर (प्रतिनिधी) 24 जून.
दिनांक १५/०४/२०२४ रोजी फिर्यादी नामे तुषार अशोक शेळके वय-२० वर्षे रा. वडगाव गुप्ता ता.जि. अहमदनगर फिर्याद दिली की, दिनांक १५/०४/२०२४ रोजी रात्री १०/०० वा चे सुमारास माझे वडील अशोक श्रीधर शेळके यांना शेंडी बायपास रोडवर डोंगरे वस्तीजवळ शिंदे यांच्या शेतात त्यांचा ओळखीचा निखिल शिवाजी गांगर्डे रा. दत्तनगर वडगाव गुप्ता ता.जि. अहमदनगर याने पैशाच्या व्यवहारातुन झालेल्या वादामुळे त्याच्याकडील चाकुने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन त्यांना गंभीररीत्या जखमी केले आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोस्टे गुरजिनं ३७५/२०२४ भादवि कलम ३०७, ३२७,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि माणिक चौधरी यांना सदर गुन्हयातील फरार आरोपी नामे निखिल शिवाजी गांगर्डे वय-२६ वर्ष रा. दत्तनगर वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर हा सातारा येथे असल्याचे गोपनिय माहिती मिळाली त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन चे तपास पथक तयार करुन सदर आरोर्पीना पकडण्याकरीता रवाना केले. आरोपीस साकुर्डी ता. कराड जि. सातारा येथुन शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव निखिल शिवाजी गांगर्डे रा. दत्तनगर वडगाव गुप्ता ता.जि. अहमदनगर असे सांगीतले. आरोपीने सदर गुन्हयाची कबुली दिली असुन सदर गुन्हयात आरोपीला अटक केली आहे.

सदरची कारवाई मा.श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, श्री. संपतराव भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोहेकॉ नंदकिशोर सांगळे, पोहेकों राजु सुद्रिक पोहेकॉ नितीन उगलमुगले, पोना विष्णु भागवत, पोकों किशोर जाधव, पोशि नवनाथ दहिफळे, तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोकों/राहुल गुंडु यांचे पथकाने केली. ब्युरो रिपोर्ट महेश चव्हाण सह जॉन पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. (अहिल्यानगर) अहमदनगर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे