सामाजिक
बाबासाहेब आंबेडकर शाळेत मुलांचे औक्षण करून प्रवेश.
0
0
2
8
6
6
...*
*अ.नगर – छावणी परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव कार्यक्रम करण्यात आला. मुलांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प, खाऊ, पेन्सिल, रबर देण्यात आले. तसेच समग्र शिक्षा अंतर्गत पाठ्यपुस्तक वितरण इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी कॅन्टों.बोर्डाचे मनोनित सदस्य मा. वसंत राठोड साहेब, स्नेहबंध सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. उध्दव शिंदे साहेब एस.एम.सी सदस्य परदेशी मॅडम, पूजा मॅडम, शाळेतील जेष्ठ शिक्षिका पाटकुलकर मॅडम, श्री हजारे सर, शेख सर भारूड सर, लवांडे मॅडम, गायकवाड मॅडम, लबडे सर, पाटील मॅडम सगीर सर, सायली मॅडम, उपस्थित होते. चोभे मॅडम यांनी सुत्रसंचालन केले व आभार मोहिते सर यांनी मानले.*
0
0
2
8
6
6