Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे असे म्हणत माजी आमदार भीमराव धोंडे यांना ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारा विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल!

0 0 2 7 7 8

तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे असे म्हणत माजी आमदार भीमराव धोंडे यांना ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारा विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल!

अहमदनगर दि. 29 जून (प्रतिनिधी )
तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. ती सोशल मिडियावर व्हायरल करुन तुमची बदनामी करु, तुमच्याविरुद्ध पोलिसांना बलात्काराचा गुन्हा दाखल करायला भाग पाडू आणि तुमचं राजकीय अस्तित्व पूर्णतः संपवून टाकू, अशी धमकी देत माजी आमदार भीमराव धोंडे यांना ‘बॉक्सर’ नावाच्या पत्रकारासह दोन महिलांनी ‘ब्लॅकमेल’ केलंय.
याप्रकरणी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या पत्रकाराला अटक करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. एका पोर्टलचा हा पत्रकार असून कोतवाली पोलीस ठाण्यात यापूर्वी त्याची सतत ये – जा सुरू होती. दरम्यान, पत्रकाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या या घटनेमुळे नगरच्या पत्रकारितेत प्रचंड खळबळ उडाली आहे. अँक्टिव्ह मराठी न्यूज. अहिल्यानगर.अहमदनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे