Breaking
ब्रेकिंगराजकियसामाजिक

अ.नगरच्या हद्दीतून गांजा तस्करी गृह, एक्साईज विभाग झोपा काढत आहे काय ? – किरण काळेंचा संतप्त सवाल ;

0 0 2 7 7 8

;

पुणे ड्रग्स प्रकरणाची पुनरावृत्ती नगरमध्ये होऊ नये यासाठी पोलीस, एक्साईज विभाग काय कारवाई करत आहे ? – …अन्यथा काँग्रेसचा एक्साईज विरोधात आंदोलनाचा इशारा

अ.नगर २५ जून (प्रतिनिधी) : पुण्याच्या एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये तरुणाई ड्रग्सचे सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नगर शहर व लगतच्या तालुका परिसरातील हायवे लगत असणाऱ्या महाविद्यालय परिसरात रात्री उशिरापर्यंत परमिट रूम, बिअर शॉपी सुरू असतात. या ठिकाणी महाविद्यालयीन युवक, युवतींना मद्य सेवनाचे परवाने नसताना देखील सर्रासपणे मद्य विक्री केली जाते. या ठिकाणी केवळ मद्यच विक्री होते की ड्रग्स देखील उपलब्ध करून दिले जातात ? हुक्का पार्लर देखील या ठिकाणी चालविले जातात अशी चर्चा आहे. पुणे ड्रग्स प्रकरणाची पुनरावृत्ती नगरमध्ये होऊ नये यासाठी काय प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस, एक्साईज विभाग करत आहे ? नगरच्या हद्दीतून गांजा तस्करी होत आहे,
सरकार झोपा काढत आहे काय ? देवेंद्र फडणवीस यांचा गृह विभाग, शंभूराजे देसाई यांचा एक्साईज विभाग काय दिवे लावत आहे ? असा संतप्त सवाल लेखी निवेदनाद्वारे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
शहर काँग्रेसने गृहमंत्री ना.फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना याबाबत लेखी निवेदन पाठवून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसच्या वतीने पाठवण्यात आलेल्या निवेदनात काळे यांनी म्हटले आहे की, नगर शहर व लगत असणाऱ्या महाविद्यालयांच्या परिसरातील तरुणाई नशेच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील नगर कॉलेज, तसेच त्या जवळ अन्य दोन-तीन महाविद्यालय आहेत. तसेच विळद घाटात देखील मोठे शैक्षणिक संकुल आहे. शहराच्या अन्य परिसरातील महाविद्यालयां लगत असणाऱ्या भागात देखील हीच परिस्थिती आहे. महाविद्यालयां लगत असणाऱ्या विविध ठिकाणी अवैधरित्या दारू, बियर विकली जाते.
परवानाधारक परमिट रूम, बियर बार रात्री नियमाचे उल्लंघन करून उशिरापर्यंत सुरू असतात. या ठिकाणी हुक्का पार्लर चालवले जातात अशी चर्चा आहे. ड्राय डेच्या दिवशी सुद्धा राजरोसपणे विक्री सुरू असते. परवानगी देण्यात आलेल्या आस्थापना नियमात चालविल्या जात नाहीत. विशेष म्हणजे महाविद्यालयीन तरुण पिढी ग्राहक म्हणून नशेच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येते. या हॉटेल्सवर रात्री अपरात्री मारामाऱ्यांच्या घटना देखील होत आहेत. तशा फिर्यादी देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. याबाबत पोलीस आणि एक्साईज विभागाची संयुक्त कारवाई का केली जात नाही, असा सवाल काळे यांनी केला आहे.
पुणे पोर्शे ड्रंक अँड ड्राईव्ह केस घडली तर ? :
तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. त्यांना नशेची साधनं सहजरित्या उपलब्ध होत आहेत. नुकताच नगर जिल्ह्याच्या हद्दीत दीडशे किलो गांजा मुंबई पोलीस विभागाने रेड करून पकडला. नगर जिल्हा आणि शहराच्या हद्दीतून ही तस्करी सुरू आहे. यातील काही गांजा, ड्रग्स नगर शहरात देखील वितरित होत आहे काय ? याचा तपास पोलीस आणि एक्साईज करणार आहे की नाही ? असा सवाल शहर काँग्रेसने केला आहे. काळे म्हणाले, महाविद्यालय परिसरात मुले परिसरात असणाऱ्या परमिट रूमवर रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने नशा करत धिंगाणा घालतात. मारामाऱ्या करतात. यातील अनेक घटनांची पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार होत नाही. मात्र दारूच्या नशेत पुण्यातील पॉर्शे ड्रंक अँड ड्राईव्ह केस प्रमाणे काही दुर्घटना घडली तर याला पोलीस आणि एक्साईज विभाग जबाबदार राहील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. प्रशासन कोणालाही अभय देऊ नये असे काँग्रेसने म्हटले आहे.
कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे :
अहमदनगर शहरात कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट उपलब्ध करून तिथे शालेय विद्यार्थ्यांसह कॉलेज विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सोय करण्यात येते. यामुळे तरुण पिढी नको त्या गोष्टींना बळी पडत आहे. यामुळे पालक देखील चिंतित आहेत. अशा अवैद्य कॅफेंवर पोलिसांनी कडक कारवाई कारवाई करण्याची काँग्रेसने मागणी केली आहे.
अन्यथा एक्ससाइज विरोधात आंदोलन

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे