Breaking
ब्रेकिंगसामाजिक

शासकीय अधिकारी यांच्याकडून पत्रकारस अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी तहसीलदार यांना निवेदन व राहुरी पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला.*

0 0 2 7 7 8

शासकीय अधिकारी यांच्याकडून पत्रकारस अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी तहसीलदार यांना निवेदन व राहुरी पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला.*
राहुरी प्रतिनिधी दि.२७ राहुरी तालुक्यातील मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून एका पत्रकाराला अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांनी व्यक्त केले. राहुरी तालूक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आले. या प्रसंगी निसारभाई सय्यद बोलत होते.
काल दि. २६ जून २०२४ रोजी शिक्षक मतदार संघाची मतदान प्रक्रिया पार पडली. राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या एका हाॅलमध्ये मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारी सुमारे दिड वाजे दरम्यान शहरातील एक इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार मतदानाची बातमी घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी मतदानासाठी लागलेल्या रांगेचे चित्रीकरण घेतले. नंतर मतदान सुरु असलेल्या हाॅलमध्ये गेले. आणि त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेल्या अधिकाऱ्यांना मतदानाची शूटिंग घेऊ का? अशी विचारणा केली. त्यावेळी संबंधित तसं अधिकारी यांनी संबंधित पत्रकाराला धकलून बाहेर व्हा. नाहीतर गून्हा दाखल करील, अशी धमकी दिली.
अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना अशी अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल हे यावरून स्पष्ट होते. या घटनेचा आम्ही राहुरी तालूक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाचे पत्रकार संबंधित अधिकारी व प्रशासनाचा तीव्र शब्दात जाहिर निषेध करतो. असे तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी पत्रकारांच्या वतीने संबंधित अधिकारी व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, आर आर जाधव, राजेंद्र उंडे, कर्णा जाधव, अनिल कोळसे, रियाज देशमुख, विनीत धसाळ, रमेश खेमनर, बंडू म्हसे, सचिन पवार, नानासाहेब जोशी, आप्पासाहेब मकासरे, अशोक मंडलिक, मनोज साळवे, राजेंद्र पवार, राजेंद्र म्हसे, कृष्णा गायकवाड, सतीष फुलसौंदर, मीनाश पटेकर, शरद पाचारणे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आकाश येवले, देवराज मंन्तोडे आदिसह अनेक पत्रकार उपस्थित होते. प्रतिनिधी प्रशांत जोशी अँक्टिव्ह मराठी न्यूज. राहुरी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे