Breaking
गुन्हेगारी

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात १३५ किलो गांजासह एकूण 45 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त*

0 0 2 8 7 5

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात १३५ किलो गांजासह एकूण 45 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त*

रायगड, दि.17:— राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने सापळा रचून गांजा या अंमली पदार्थाची
आरोपींच्या ताब्यातून १३५ किलो गांजासह एक चारचाकी ईनोव्हा वाहन असा एकुण ४५ लाख ७५ हजार रूपये किमंतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

१२ जून रोजीच्या कारवाईतील आरोपींना आज दिनांक १५ रोजी मा. प्रथम वर्ग न्यायालय पनवेल यांनी दिनांक १९ जून २०२४ रोजी पर्यंत एक्साईज कस्टडी रिमांड दिला आहे. सदर आरोपींच्या चौकशी दरम्यान माहिती मिळाल्याने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २, पनवेल, जि. रायगड या कार्यालयाने सापळा रचला. सायंकाळी ५ ते ६ वाजे दरम्यान ईनोव्हा गाडीने जुना मुंबई-पुणे रोडवर पंचमुखी मारूती मंदिर समोर पनवेल या ठिकाणी आरोपी हनोझ होशी इंगीनीर (इंजिनियर) रा. लोणावळा, व दिवा उंबरे मालासह तक्का पनवेल आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सापळ्यात अडकले. आरोपींच्या ताब्यातून १३५ किलो गांजासह एक चारचाकी ईनोव्हा वाहन असा एकुण ४५ लाख ७५ हजार रूपये किमंतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.

पंचनामा करून गुन्हयाच्या पुढील तपासासाठी आरोपी विरूध्द एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये. कलम ८ (क), २० (ब) (II), २९ तसेच भा. द. स. कलम ३२८ अन्वये गुन्हा नोंद करून दिनांक १२/०६/२०२४ रोजीच्या गुन्हामध्ये सह आरोपी म्हणून अटक केली.

कारवाई करताना डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक श्री. उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक श्री. डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, दुय्यम निरीक्षक कृष्णा देवरे, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, दुय्यम निरीक्षक गणेश कुदळे तसेच जी. सी. पालवे, श्री. सखाराम पवार हे सहभागी होते. गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक श्री. पाटणे हे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 7 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे