Breaking
सामाजिक

महानगरपालिकेच्या कचरा डेपोला कुलूप लावणार माजी सरपंच बापूसाहेब कुलट यांचा इशारा .आश्वासन देऊनही काम न करता बुरुडगावच्या लोकांना काढले वेड्यात*

0 0 2 8 6 9

महानगरपालिकेच्या कचरा डेपोला कुलूप लावणार माजी सरपंच बापूसाहेब कुलट यांचा इशारा .आश्वासन देऊनही काम न करता बुरुडगावच्या लोकांना काढले वेड्यात*

अ.नगर (प्रतिनिधी).14जून महानगरपालिका अहमदनगर 2019 ला बोरगाव कचरा डेपोसाठी ना हरकत प्रमाणपत्र दाखला देण्यात आला होता. इतिवृत्त प्रमाणे पिण्याचे पाणी पाईप लाईन बुरडगाव ते कचरा डेपो पर्यंत पाईप लाईन विद्युत पद्धतीने रस्ता, ड्रेनेज व वृक्षारोपण देण्याचे ठरवले होते. यापैकी मनपाने कुठलेही सुविधा बुरुडगावकरांना दिलेली नाही, कुठल्याही कामाची पूर्तता झाली नाही. मनपाचे आयुक्त, आमदार साहेब, नगरसेवक सर्व पदाधिकारी मिटींगला उपस्थित होते. पाच वर्षे पूर्ण झाले तरी आम्हा बुरडगावकरांना सुविधा पुरविल्या नाहीत गावकऱ्यांना वेड्यात काढण्याचे काम केले.. आपण पाहता कचरा डेपोला आग लागली की लावली याची सखोल चौकशी होत नाही. बुरूडगावतील तसेच नगर शहरातील माळीवाडा हरीजन वस्तीत जनतेला वेळेवर पाणी मिळत नाही. परंतु मनपा डेपोला लागलेली आग विझवण्यासाठी मॉर्डनच्या टँकरच्या पालख्याचा वापर करावा लागत आहे. कचरा डेपो शेजारी अधिक शेतकर्यांच्या खाऱ्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यांना विनंती केली तर अहो रात्री आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध झाले असते. वसंत टेकडी वरून पाण्याचे ट्रीप आणण्यासाठी एक ते दीड तास लागतो. शेतकऱ्यांना दोनशे रुपये प्रमाणे ट्रिप दिली तर किंवा सीना नदीतून पाणी उपसले तर बारा तासाच्या आत डेपोला लागलेली आग विझली असते परंतु याचा विचार कुठलाही अधिकारी करत नाही. कचरा डेपोसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन स्वतःचे नातेवाईक जवळचे पांहूने यांना उद्योग धंदे चालविण्याकरिता दिले आहेत. बुरुडगावातील सर्व नागरिकांना वाऱ्यावर सोडले. कचरा साडलेने कुत्रे, रानडुकरे याचा सर्व त्रास शेजारील नागरिक, शेतकऱ्यांना होत आहे. तरी मिळालेला मलिदा अधिकारी व पदाधिकारी यांना आहे. संबंधित अधिकारी यांनी अतिरिक्त प्रमाणे असलेली कामे लवकरात लवकर सुरू करावेत. अन्यथा यापुढे मनपाला कुठलेही पत्र व्यवहार न करता कचरा डेपोला येणाऱ्या कचरा गाड्या डेपोत न जाऊ देता ते कचरा डेपो ला कुलूप लावण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी उपस्थित शिंदे भाऊ, नानाभाऊ मोडवे, भानुदास घोडके, सिताराम जाधव, माजी सरपंच बापूसाहेब कुलट आदी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे